ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत..
ताडोबा जंगल सफारीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करु नये याबाबत... ताडोबा जंगल म्हटलं तर सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं महाकाय आणि घनदाट जंगल आणि त्यामध्ये खेळणारे , आपल्या कुटुंबासमवेत बागडणारे वाघ आणि अन्य प्राणी... अशा वन्यप्राण्यांना काही अंतरावरुन पाहण्यासाठी आणि या साहसाचा अनुभव घेण्यासाठी ' झरना जंगल लॉज ' ने तुमच्या-आमच्यासारख्या पर्यटकांसाठी ताडोबा जंगल सफारी सुरु केली आहे ; पण ताडोबा जंगल सफारीचे हे साहस उत्तमरित्या पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही बाबी करायच्या टाळल्या पाहिजेत... त्या काय आहेत पाहू यात पुढीलप्रमाणे... हे नक्की करा... तुमचे कपडे जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेतः ताडोबा जंगल सफारीमध्ये येण्यापूर्वी तुम्ही जे कपडे निवडाल ते जंगल थीमप्रमाणे असले पाहिजेत किंवा तुमचे कपडे लष्कराच्या गणवेशासारखे असले तर उत्तमोत्तम. कारण काही गडद किंवा उठावदार रंगानी प्राणी गोंधळू शकतात म्हणून शक्यतो , अशी कपडे परिधान करावीत. कॅमेराः जंगल सफारीचा अनुभव तुमच्याकडे असावा यासाठी कॅमेरासोबत ठेवा. याद्वारे तुम्ही चांगले फोटोही काढू शकत