Posts

Showing posts with the label tiger of tadoba

ताडोबामधील वैशिष्ट्यपूर्ण वाघ!

Image
नोव्हेंबर महिना चालू झाला आणि गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मधील जंगल सफारी अनुभवण्यासाठीचा उत्तम ऋतू आता सुरु आहे. हिवाळा ऋतू म्हणजे पर्यटक व वन्यजीव प्रेमींसाठी उत्तमोत्तम नैसर्गिक सौंदर्य दृश्ये आणि वेगवेगळ्या सुरेख वनस्पती बघण्यासाठीचा काळ असतो. हिवाळ्याच्या सुरुवातीला ताडोबा नॅशनल पार्क हे अगदी थोडे थंड असते. म्हणजे अगदी हळूहळू तेथे थंडी पसरत असते. तलावाजवळ सुद्धा अगदी सौम्य धुके आपल्याला दिसू शकते. ही तीच वेळ असते जेव्हा पर्यटकांना जंगलात वाघ मनसोक्तपणे फिरताना दिसतात. वाईल्डलाईफ एक्सपर्ट्सच्या मते, थंडीच्या काळात सकाळच्या वेळी वाघांना भटकायला फार आवडते. हा खरंच त्यांचा आवडता वेळ असतो जेव्हा ते दाट वनक्षेत्रात गस्त घालतात, तर चंद्रपूरला भेट देण्याची आणि जंगल सफारीसाठी ही अतिशय योग्य वेळ आहे. सफारी जीप मध्ये बसण्याअगोदर ताडोबा मधील जंगल सफारीचे स्टार - तिकडच्या लोकप्रिय वाघांबद्दल जाणून घेऊया!! माया (वाघीण) -  माया ही ताडोबा जंगल सफारीची खरी स्टार आहे. ही एक अशी वाघीण आहे जीच्या अस्तित्वाने व मोहिनीने संपूर्ण जंगलावर तिचे राज्य आहे. तिल...