जंगलातील पावसाळी सफर !
पावसाळा चालू झाला की अनेकांना पावसाळी सहलीचे वेध लागतात. ट्रेकिंगला किंवा चांगल्या देखाव्याच्या ठिकाणी जायला सर्वांनाच आवडते.. परंतु कोणी पावसाळ्यात जंगलाची सफर करण्याचा विचार केला आहे का? नसेल केला तर नक्कीच करावा.. 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' हा पावसाळ्यात जंगलाची सफर किंवा सफारी करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' हे पर्यटकांसाठी बंद असते अशा अनेक अफवा आहेत. परंतु खरे बघितल्यास पावसाळा हा जंगलातील सर्व प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांसाठी विलक्षण सक्रिय काळ असतो. त्यामुळे खरे सांगायचे झाल्यास पावसाळ्यात हे संपूर्ण रिझर्व्ह सुरु असते, परंतु केवळ २० जीप ना आत जाण्याची परवानगी असते. पावसाळा सुरु झाल्यावर जूनमध्ये येथे जवळपास १,२०० मि.मी. चा पाऊस पडतो आणि आर्द्रता जवळपास ६० टक्के असते. पावसाळ्यामुळे रिझर्व्ह हे नवे जीवन मिळाल्यासारखे अतुलनीय सुंदर दिसायला लागते, संपूर्ण झाडांना पालवी फुटते व संपूर्ण जंगलामध्ये हिरवळ पसरू लागते. तसेच या काळात शाकाहारी प्राण्यांसाठी खाद्याची निर्मिती सुद्धा जंगलात होत असते. याप्रमाणेच पावसाळ...