ताडोबाचा प्राचीन इतिहास !
एखाद्या जागेचा इतिहास म्हणजे त्याची एक वेगळी ओळखच असते. आपल्या भारतात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारके आहेत, त्यामागे त्यांचा खूप मोठा इतिहास आहे. ते भारतातील ऐतिहासिक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात जे जगभरात लोकप्रिय आहे. हा जरी भूतकाळातील इतिहास असला तरीही तो पूर्वीच्या युगातील महानता, तथ्ये आणि अनेक मनमोहक माहिती सांगतो. पर्यटन स्थळांच्या कलात्मक सौंदर्याव्यतिरिक्त, आपण त्या ठिकाणच्या भूतकाळाबद्दल देखील शिकले पाहिजे. त्या युगाबद्दल बरेच काही सांगणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेताना तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
जंगलाचे सुद्धा ऐतिहासिक महत्त्व असू शकते आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाबद्दल सुद्धा हे सत्य आहे. वाघांसाठी ओळखले जाणारे आणि सोबतच विविध आकर्षक झाडे-झुडुपे असणाऱ्या ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्हचा (TATR) एक चांगला इतिहास आहे. TATR च्या संपूर्ण विभागावर गोंड आदिवासींचे राज्य होते आणि चंद्रपूर हे रेल्वे स्थानक या राजधानीच्या सर्वात जवळचे आहे. त्या काळात जंगल घनदाट होते आणि तेथे प्राचीन मंदिरे होती. यातील एक मंदिर तिकडच्या एका ताडू किंवा तारु नाव असणाऱ्या आदिवासीला समर्पित केलेले आहे. असे म्हणतात त्याने मोठ्या साहसाने वाघाशी लढा दिला आणि त्या लढाईत झालेल्या जखमांमध्ये त्याचे निधन झाले. ते मंदिर त्याला समर्पित करण्यात आले आणि यासोबतच संपूर्ण जंगलाला सुद्धा त्याच्या नावावरून नाव देण्यात आले.
ताडोबाच्या जंगलात फिरताना, अनेक ठिकाणी मोठमोठाले खांब पर्यटकांना दिसतील. ते काही साधारण खांब नाहीत, तर संवाद साधण्याचा मार्ग आहे. प्रत्येक खांबाच्या टोकावर एक रिंग आहे, ज्यातून एक मोठे दोरखंड प्रत्येक खांबातून सोडलेले आहे. पूर्वी यातूनच राजाचे आगमन सूचित होत असे. अशावेळी जेव्हा मंदिरात राजाचे आगमन व्हायचे तेव्हा लोकांना व पंडितांना सावध केले जायचे. त्याचप्रमाणे कोणता धोका किंवा कोणी शत्रू तेथे गुप्तहेरी करत आला असल्यास यातूनच सर्वांना सावध केले जायचे. जेव्हा ही राजा त्याच्या मार्गातून निघायचा तेव्हा त्याची सेना ही दोरखंड खेचून रिंग वाजवत असे, ज्यामुळे राजा कुठे येत आहे हे लोकांना कळत असे.
तर, इथे पर्यटकांना त्यांच्या सफारी सोबत असा मनोरंजक इतिहास सुद्धा जाणून घेता येईल असे दिसते..
Comments
Post a Comment