राष्ट्रीय उद्यानातील एक सहल!



राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्ये ही लहानपणापासूनच सर्वांचे अगदी आवडते पिकनिक स्पॉट ठरत आले आहेत. लहान मुलं गोष्टींमधून अशा जंगलातील प्राण्यांकडे आकर्षित होतात. मुलं नेहमीच प्राण्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. ते प्राण्यांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी तयार करतात आणि नाटक व नृत्य स्पर्धांमध्ये त्याचे सादरीकरण करतात. आपला देश सुद्धा राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांद्वारे वन्य जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भारतातील बहुतेक शहरांमध्ये त्यांची वेगळी उद्यानं आहेत जी उत्तम पर्यावरण-व्यवस्थेसाठी संरक्षित केली गेली आहेत.


प्राणी वाचविण्याव्यतिरिक्त, निसर्गातील निरनिराळ्या वनस्पतींचे सुद्धा संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
सध्या आमच्याकडे अशा अनेक साहसी जंगल सफारी आहेत ज्या तुम्हाला जंगलातील श्रीमंतीचे दर्शन घडवेल. राष्ट्रीय उद्याने आणि प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी असले तरी, जंगल सफारी तुम्हाला जीपमधून प्राण्यांबद्दलच्या वैशिष्टांचे जवळून दर्शन घडवते. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्हच्या जवळ असलेले झरना जंगल लॉज हे तुमच्यासाठी टायगर रिझर्व्ह मधील उत्तम अशी जंगल सफारी आयोजित करते. तुम्हाला यामध्ये जंगल सफारी सोबतच इतरही ऍक्टिव्हिटीजचा आनंद लुटता येईल. आता दिवाळीची सुट्टी जवळ येत आहे आणि या सुट्ट्यांमध्ये काहीतरी वेगळे आणि थरारक अनुभवण्यासाठी तुम्ही आजच झरना जंगल लॉज मधील 'दिवाळी सफारी' बुक करू शकता.


जंगल सफारीला किंवा राष्ट्रीय उद्यानात जाणे हे एक प्रकारे मजेदार आणि रोमांचक ठरू शकते. यासोबतच येथे भेट देण्याची अजूनही काही कारणे आहेत. प्राणी संवर्धन, वनस्पती आणि निसर्ग पर्यावरणाविषयी जागरूकता याबद्दल माहिती मिळवणे हे सुद्धा खूप मजेदार ठरू शकते. अशा सफारींमुळे निसर्ग आणि त्यांच्या महत्त्वाबद्दल लोकांना बरेच काही माहिती होते. वाईल्डलाईफ फोटोग्राफर्स, बर्ड वॉचर्स आणि निसर्ग अभ्यासक हे जंगलातील मुख्य पर्यटकांपैकी एक आहेत. तुम्ही जंगलात ट्रेकिंग किंवा रोप वॉकिंगच्या माध्यमातून स्वतःला गुंतवू शकता.
तथापि, आपण हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपले मुख्य ध्येय म्हणजे निसर्गाचा स्वीकार करणे आहे, त्यास खराब करणे नव्हे. आपण आपले जंगल स्वच्छ व सुंदर ठेवणे गरजेचे आहे. त्याप्रमाणेच जंगलांना भेटी देणाऱ्या लोकांची संख्या वाढवण्यासाठी जंगल ऑथोरिटीजना आपण मदत केली पाहिजे. 

Comments

Popular posts from this blog

How can I go to Tadoba from Hyderabad?

How can I go to Tadoba from Mumbai?

Best Time to Visit Tadoba National Park