आपल्या मुलांना जागरूक करा!
असे म्हणतात की बालपण हा आपल्या जीवनाचा सर्वात निर्दोष आणि संवेदनशील टप्पा आहे. या टप्प्यावर आपण जे काही मुलांना शिकवतो ते कायमच त्यांच्या मेंदूत साठवले जाते आणि ते आयुष्यभरासाठी त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येते. म्हणूनच, त्यांच्या मनात योग्य विचारांचा समावेश करणे आवश्यक आहे. कथांच्या माध्यमातून लहान मुलांना आपण प्राण्यांविषयी माहिती देतो, त्यामुळे लहान मुलांना प्राण्यांविषयी नेहमीच आकर्षण असते. जंगली प्राण्यांशी त्यांची पहिली भेट बहुतेक प्राणीसंग्रहालय आणि राष्ट्रीय उद्यानांच्या सहलींमध्येच होत असते. त्यांना राष्ट्रीय उद्यानात नेताना पालकांनी वन्यजीव आणि त्यासंबंधी नियमांबद्दल त्यांना माहिती देणे, समजावणे आवश्यक आहे. पालकांव्यतिरिक्त शाळांनीही वन्यजीव संवर्धन कसे व का करावे हे मुलांना शिकवावे. मुलांना वन्यजीव संवर्धनाबद्दल, प्राण्यांबद्दल जागरूक करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे पाठ्यपुस्तकांद्वारे त्यांना समजावता येईल . प्राण्यांची चित्रे , स्टिकर्स , फोटो , आकृत्या हे सर्व आपण त्यांना आकर्षित करण्यासाठी वापरू शकतो . त्यांना जंगल , पर्यावरण आणि वन्यजीवनावरील ...