ताडोबा येथे ब्लॅककॅप्ड किंगफिशरचे मनमोहक दृश्य अनुभवा!!
आपल्या सर्वांना माहित आहे की ताडोबा हे एक जैवविविधतेचे समृद्ध असे अतिशय सुंदर केंद्र आहे आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा त्यामुळे त्याच्या पर्यटकांना जंगलाचा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव प्रदान करतो.
जंगल सफारी व्यतिरिक्त, ताडोबा नॅशनल पार्क हे स्थलांतरित झालेल्या पक्ष्यांमुळे लक्ष वेधून घेत आहे. २०१९च्या जूनमध्ये अनेक पर्यटकांना ताडोबामध्ये लोकप्रिय ब्लॅक कॅप्ड किंगफिशरचे दर्शन घडून आले. हा पक्षी जरी भारतात राहत असला तरीही त्याच्या दर्शनाने ताडोबामधील पर्यटक आणि पक्षीप्रेमी आनंदित झाले. हा पक्षी भारत (अंदमान), श्रीलंका, कान्सू, शांशी, कोरिया, मलय पेनिन्सुला, थायलंड आणि इतर अनेक जैवविविधतेने समृद्ध असलेल्या देशांमध्ये आढळून येतो. ब्लॅक कॅप्ड किंगफिशर हा उंचीने ११ इंच मोठा असतो. काळं डोकं, जांभळे-निळे-काळे-निळे पंख, पांढरी कॉलर नेक अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये किंगफिशर दिसून येतात. पक्षीप्रेमींसाठी ताडोबामध्ये बर्ड वॉचिंग करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव ठरतो.
तुम्ही पक्षीनिरीक्षण (बर्डवॉचिंग) केले आहे काय?
बर्डवॅचिंग ही जलदगतीने वाढणारी वन्यजीव निरीक्षण ऍक्टिव्हिटीजपैकी एक आहे जी निसर्गप्रेमी एक छंद म्हणून स्वीकारत आहेत. लोक सतत पक्षांबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल संशोधन करत आहेत, त्यांचे फोटो उत्सुकतेने क्लीक करत आहेत. बर्डिंग हा प्रत्येकासाठी एक जिवंत अनुभव आहे. तुम्ही जेव्हा बर्डवॉचिंगसाठी जाल तेव्हा जंगलात अधिकाधिक पक्षी दिसण्यासाठी सकाळची वेळ निवडणे योग्य ठरते. खरे तर मॉर्निंग वॉक म्हणजेच बर्डवॉचिंग असेही म्हणता येईल. बर्डवॉचिंग हे त्याच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी लोकप्रिय होत आहे. हा छंद एका आरामदायी खुर्चीवर बसून जोपासता येत नाही, तुम्हाला त्यासाठी बाहेर पडावे लागते, तुमच्यामधील पक्षीप्रेमीला समाधानी करण्यासाठी तुम्हाला चालत रहावे लागते आणि त्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत बसलेले किंवा उडत असलेले विविधरंगी, विविध प्रकारचे पक्षी दिसून येतात. तेथेच तुम्ही एका आरोग्यदायी जीवनशैलीच्या जवळ येता. तुमचे शरीराला आणि मनाला जंगलातील वातावरणात शांतता मिळेल. यामुळे तुमची एकाग्रताही नक्कीच वाढेल.
पक्षी निरीक्षणाला केंव्हा सुरुवात करावी हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही ताडोबाची ट्रिप प्लॅन करा आणि आमच्या निसर्ग तज्ज्ञांकडून जंगलातील पक्षीनिरीक्षणाचे धडे शिकून घ्या. स्वतःला एक नवा छंद भेट देण्याची नवीन वर्ष ही उत्तम वेळ आहे. झरना जंगल लॉजमध्ये आम्ही पक्षी निरीक्षण, जंगल सफारी, नेचर वॉक हे तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो. आनंदी आणि लक्झरियस स्टेसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आणि तुमच्या एडव्हेंचरचे अरेंजमेंट्स आमच्यावर सोडा!
हॅपी बर्डवॉचिंग टू यू!
Comments
Post a Comment