आपल्या मुलांना जागरूक करा!
असे म्हणतात की बालपण हा आपल्या जीवनाचा सर्वात निर्दोष
आणि संवेदनशील टप्पा आहे. या टप्प्यावर आपण जे काही मुलांना शिकवतो ते कायमच त्यांच्या
मेंदूत साठवले जाते आणि ते आयुष्यभरासाठी त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येते. म्हणूनच,
त्यांच्या मनात योग्य विचारांचा समावेश करणे आवश्यक आहे. कथांच्या माध्यमातून लहान
मुलांना आपण प्राण्यांविषयी माहिती देतो, त्यामुळे लहान मुलांना प्राण्यांविषयी नेहमीच
आकर्षण असते. जंगली प्राण्यांशी त्यांची पहिली भेट बहुतेक प्राणीसंग्रहालय आणि राष्ट्रीय
उद्यानांच्या सहलींमध्येच होत असते. त्यांना राष्ट्रीय उद्यानात नेताना पालकांनी वन्यजीव
आणि त्यासंबंधी नियमांबद्दल त्यांना माहिती देणे, समजावणे आवश्यक आहे. पालकांव्यतिरिक्त
शाळांनीही वन्यजीव संवर्धन कसे व का करावे हे मुलांना शिकवावे.
मुलांना वन्यजीव संवर्धनाबद्दल, प्राण्यांबद्दल जागरूक
करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे पाठ्यपुस्तकांद्वारे त्यांना समजावता येईल. प्राण्यांची चित्रे, स्टिकर्स, फोटो, आकृत्या हे सर्व आपण त्यांना आकर्षित करण्यासाठी वापरू शकतो. त्यांना जंगल, पर्यावरण आणि वन्यजीवनावरील मनोरंजक पुस्तके दाखवा. शाळांमधून मुलांना वन्य जीवन आणि जंगलाचे वातावरण दाखविण्यासाठी यावर आधारित नाटक किंवा स्किट देखील बनवून त्यामार्फत त्यांना जागरूक करा. त्यामार्फत प्राण्यांबद्दल त्यांच्या मनात प्रेम आणि सहानुभूती निर्माण व्हावी हीच त्यामागची संकल्पना आहे. शाळेत असताना मुलांना प्राण्यांबद्दल असणाऱ्या या क्रियांमध्ये गुंतवा.
प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारणे आणि ते कसे चुकीचे आहे याविषयी मुलांना माहित असणे आवश्यक आहे. मानवा-प्राण्यांचा संघर्ष आणि ज्यात अनेकदा प्राण्यांचा जीव जातो हे सर्व कसे चुकीचे आहे हे त्यांना कळले पाहिजे. साधारणपणे, मुलांनी असा विचार केला पाहिजे की मानव आणि प्राणी एकत्र राहण्यासाठी जन्माला येतात, आणि जिथे त्यांच्याही स्पेसचा आदर केला पाहिजे. विद्यार्थ्यांना प्राण्यांबद्दल आणि वन्यजीवांबद्दल अधिक माहिती करून देण्यासाठी त्यांना अभयारण्य आणि जंगल सफारीसाठी घेऊन जावे
Comments
Post a Comment