तुमच्या पहिल्या टायगर सफारीसाठी कसे तयार व्हाल?



ऑफिस ते घर - घर ते ऑफिस या रुटीनला कंटाळला आहात? काही नवीन करावसं वाटतयं... मग वाट कसली पाहताय??? ताडोबा अभयारण्य तुमची वाट पाहत आहे. महाराष्ट्रातील नं. १ क्रमांकाचे ताडोबा जंगलातील जंगल सफारीला जा आणि मनमोहक वाघांना पाहण्याचा आनंद लुटा. एवढचं नाही झरना जंगल लॉज तुमची राहण्याची, खाण्याची तसेच जंगल सफारी घडवून आणण्याची सर्व व्यवस्था करण्यासाठी सज्ज आहे आणि तेही अल्प दरामध्ये. 

पण टायगर सफारीला पोहोचण्यापूर्वी काही बाबींची काळजी घ्या. त्या आम्ही पुढे मांडत आहोत...  

सफारी सीझनः ताडोबा जंगल सफारीसाठी योग्य सीजन म्हणजे योग्य वेळेत जाणे महत्त्वाचे आहे. जून ते ऑक्टोबर हा काळ ऑफ सीझन मानला जातो. खर सीझन सुरु होतं ते ऑक्टोबर नंतर.

कपडे कोणते घालाल? जर तुम्ही मार्च ते मे हा काळ जंगल सफारीसाठी निवडलात तर तेव्हा उन्हाळा कडक असतो. अशावेळेस हलके कॉटनचे कपडे वापरा. शर्ट किंवा टीशर्ट पूर्ण हातभर असेल तर उत्तम आणि टोपीजवळ ठेवा.

कीटकांपासून कशी काळजी घ्याल? ध्यानी ठेवा ताडोबा हे जंगल आहे. तेथे असंख्य प्रकारची किटकनाशकं आहेत. तेव्हा त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी Insect Repellants क्रीम सोबत ठेवा.

कॅमेरा सोबत ठेवाः ताडोबा जंगल सफारीला जाताय तर कॅमेरासोबत नक्की ठेवा. मोठ्या लेंसचा कॅमेरा हवा याची गरज नाही. जर तुम्ही फोटोग्रॅफीचे शिक्षण घेतले असेल तर तुम्ही 150 mm ते 600 mm लेंसचा कॅमेरा असणे केव्हाही चांगले.

तर मग कधी निघताय महाराष्ट्रातील प्रसिद्ध वाघ सफारी पाहण्यासाठी???

Comments

Popular posts from this blog

How can I go to Tadoba from Hyderabad?

How can I go to Tadoba from Mumbai?

Best Time to Visit Tadoba National Park