ताडोबा राष्ट्रीय उद्यान: पक्षीप्रेमींसाठी एक नंदनवन
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे आणि सोबतच वन्यजीव प्रेमी व व्याघ्रप्रेमींसाठीचे एक लोकप्रिय ठिकाण आहे.
परंतु बर्याच जणांना हे माहित नाही की राष्ट्रीय उद्यानात ६३ वेगवेगळ्या कुटुंबातील २८० हून अधिक पक्षांच्या जाती आहेत. विविध रम्य वातावरणाचे मिश्रण आणि पाण्याचा मुबलक प्रमाणातील साठा यामुळे पक्षीप्रेमींना एक वेगळाच आनंद मिळतो.
हे राष्ट्रीय उद्यान अतिशय घनदाट व मिश्रित वनक्षेत्र असून त्यात ओली जमीन, गवत आणि बांबूची झाडे आहेत. अशा प्रकारचे निवासस्थान वन्य आणि आर्द्र प्रदेशातील पक्ष्यांसाठी अनुकूल आहे. त्याचप्रमाणे उद्यानातून वाहणारी अंधारी नदी ही दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांसाठी आणि पक्षीप्रेमींसाठी एक आकर्षणाचे स्थान आहे.
तुम्ही जर पक्षीप्रेमी असाल तर तिकडे कोणताही ऋतू असू द्या, तुम्हाला पुढील काही पक्षांच्या प्रजाती नेहमी राष्ट्रीय उद्यानात आढळून येतील:
ओरिएंटल हनी बझार्ड (तपकिरी मधाळ रंगाची घार)
व्हाईट आय बझार्ड (पांढऱ्या डोळ्यांची घार)
चेंजेबल हॉक ईगल (मोरघार)
परिह काईट (घार)
यूरेशियन स्पॅरो हॉक
ब्लॅक शोल्डर्ड काईट (काळा खांदा असलेली घार)
शिक्रा
शॉर्ट टोएड स्नेक ईगल (आखुड बोटांचा सर्पगरुड)
क्रेस्टेड सरपेंट ईगल (तुरेवाला सर्पगरुड)
बोनेलीज ईगल (बोनेलीचा गरुड)
ग्रे हेडेड फिश ईगल
कॉमन केस्ट्रल
ओपन बिल स्टोर्क (घोंगल्या फोडा)
वूली नेक्ड स्टोर्क
ब्लॅक इबिस (काळा अवाक)
बार हेडेड गूस
ब्लॅक स्टोर्क (काळा करकोचा)
लेसर एडजुटंट स्टोर्क
ब्लॅक हेडेड इबिस (काळ्या डोक्याचा शराटी)
ब्राह्मिणी डक (चक्रवाक)
लेसर व्हिसलिंग टेल (अडई)
कॉम्ब डक
लिटिल ग्रेब (टिबुकली)
ग्रे हेरुन
पॉन्ड हेरुन (वंचक)
ग्रेट इग्रेट
लार्ज इग्रेट
व्हाईट इग्रेट
मेडिअन इग्रेट
नॉर्दन पिनटेल (सरगे बदक)
लार्ज ब्रोवड वॅगटेल
ग्रे बुश चॅट
कॉमन स्टोनचॅट
पाएड बुश चॅट (कबरा गप्पीदास)
इंडियन रॉबिन (चिरक)
ब्लु रॉक थ्रश
ऑरेंज हेडेड ग्राऊंड थ्रश
प्लेन बॅकड थ्रश
ब्लु कॅपड रॉक थ्रश (निळ्या टोपीचा कस्तूर)
स्कॅली थ्रश
टिकल्स थ्रश (टिकेलची कस्तुरिका)
इंडियन रोलर (भारतीय नीलपंख)
कॉमन हुपोई
मलबार पाईड हॉर्नबिल
ब्राऊन हेडेड बार्बेट
यूरेशिअन व्रेनेक
रुफुस वुडपीकर
लेसर गोल्डनबॅक (सोनपाठी सुतार)
लेसर यलो नेप
पफ थ्रोत वार्ब्लेर
ब्लेथ्स लीफ वार्ब्लेर
रबी थ्रोत (मणिकंठ)
ब्लु थ्रोत
ओरिएंटल मॅगपाय रॉबिन (दयाळ)
ब्लॅक रेडस्टार्ट (कृष्ण थिरथिरा)
ग्रे टिट
चेस्टनट बेल्लीइड नटहॅच
स्पॉटेड क्रिपर
तुम्ही कधीही न बघितलेली पक्ष्यांची नावं सापडली का???
वर सांगितलेल्या प्रमाणे अजून पुष्कळ अशा प्रजाती ताडोबाला आढळतात. जवळपास १४५ निवासी पक्षी, ३५ स्थानिक स्थलांतरित आणि १०० स्थलांतरित पक्षी या उद्यानात बघायला मिळतात.
तुम्हाला त्या सर्वांना बघायला आवडेल काय?
जर तुम्ही उत्सुक पक्षीप्रेमी असाल तर ताडोबाला नक्की भेट द्या. झरना जंगल लॉज मध्ये तुमचा लक्झरियस स्टे बुक करा आणि स्वर्गसुखाचा अनुभव घ्या, कारण पक्षीप्रेमींसाठी हे जंगल एक उत्कृष्ट जागा आहे.
Comments
Post a Comment