झरना जंगल लॉजसोबत घ्या ताडोबाचा लाईव्ह अनुभव!!
ताडोबा हे निसर्गातील एक नंदनवन आहे हे तुम्ही ऐकलेच असेल आणि प्रत्येक निसर्गप्रेमीला अशा विविध झाडझुडपांनी व प्राण्यांनी वेढलेल्या श्रीमंत नैसर्गिक जागेचा अनुभव ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मध्ये येतोच. जंगलाला भेट देणे ही पर्यटकांसाठी रोमांचक गोष्ट असते पण त्यापेक्षाही पर्यटकांना राहण्याची, खाण्याची आणि स्वच्छतेची चिंता सतावत असते. तर अशावेळी तुम्ही रिलॅक्स रहा, कारण तुमच्या घरापासून दूर पण घरासारखेच असणारे झरना जंगल लॉज तुम्हाला सर्व सुविधा पुरवत आहे. नॅशनल पार्कजवळील नवेगाव येथे स्थित असलेले हे पूर्णपणे इको फ्रेंडली लॉज असून हे तुम्हाला फक्त स्टे च ऑफर नाही करत तर एक आनंददायी अनुभव आणि संपूर्ण आयुष्यासाठी बर्याच आठवणी प्रदान करते. चला तर बघूया ताडोबा अंधारी नॅशनल पार्क आणि झरना जंगल लॉजसोबत वाईल्डलाईफ सेंच्युरीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तुमची ट्रिप कशी प्लॅन करू शकता!! सफारी अँड नेचर (१रात्र/ २दिवस) या १रात्र आणि २दिवसाच्या टूर पॅकेजमध्ये रिसॉर्टला चेकइन केल्यावर तुम्ही तेथील रेस्टोरेंट मध्ये लंच करू शकता. यासोबतच स्विमिंग पूल, रिसॉर्ट विझीट, गार्डन एरिया आणि विविध गेम्सचा आन...