ताडोबामधील हिवाळ्यातील सैरसपाटा!
हिवाळा म्हणजे वन्यप्राण्यांचा आवडता ऋतू.. पावसाने बेजार झालेले प्राणी उकाड्याने त्रस्त होण्या अगोदर थंडीच्या दिवसांचा पुरेपूर आनंद घेतात. ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मधील वन्यजीवांची गोष्ट सुद्धा काही वेगळी नाही.. हिवाळा ऋतू ज्याप्रमाणे पर्यटनासाठी अतिशय अनुकूल असतो तसेच वन्य प्राण्यांसाठी सुद्धा थंडीचे दिवस म्हणजे जंगलात मुक्तपणे सैर करण्याचे दिवस असतात. हिवाळ्यात ताडोबा मध्ये नवनवीन व अतिशय सुरेख अशा वनस्पती-झाडांना नव पालवी फुटायला लागते.
नुकताच पाऊस संपला असल्याने व गुलाबी थंडी सुरु झाल्याने जंगल अतिशय हिरवेगार दिसू लागते. त्यामुळे वन्य जीवांना खाण्या-पिण्यासाठी मुबलक प्रमाणात खाद्य व पाणी मिळते. वन्यप्राणी निवास स्थानावरून बाहेर पडतात व जंगलात मुक्तपणे संचार करतात. म्हणून हिवाळा हा ऋतू जंगल सफारी साठी अतिशय योग्य मानला जातो. ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मध्ये हिवाळ्यात जंगल सफारीचा आनंद तर पर्यटक मिळवू शकतातच शिवाय त्यांना वाघांचे दर्शन होण्याच्या शक्यताही वाढतात. पावसाळ्यात सहसा निवासस्थानातून बाहेर न पडणारे वाघ हिवाळ्यात जंगलात यथेच्छ भटकंती करतात. थंडीच्या दिवसांत रात्री, पहाटे, सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी अशा कोणत्याही वेळेस ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मध्ये पर्यटकांना वाघ दिसू शकतात. अशी नामी संधी प्राणी पप्रेमी कधीही सोडत नाहीत. त्यामुळे हिवाळ्यात जंगल सफारी नेहमी हाऊसफुल झालेल्या असतात.
चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मध्ये हिवाळ्यात पर्यटकांची गर्दी होते. कारण एकच... ते म्हणजे वाघाचे दर्शन!! थंडीचा काळ हा वाघांचा आवडता काळ असतो. त्यामुळे अनेक पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान वाघ दिसण्याचे भाग्य लाभते. अधिकच भाग्यशाली असल्यास वाघांच्या जोड्या सुद्धा मुक्त संचाराचा आनंद उपभोगताना पर्यटकांना बघायला मिळतात. हौशी पर्यटकांना आपल्या कॅमेऱ्यात वन्य प्राण्यांसोबतच वाघांना सुद्धा चित्रित करता येते. काही महिन्यांपूर्वी पार्कमधील छोटी मधू वाघिणीचे आपल्या बछड्यांसह दर्शन झाले होते. आता हे बछडे मोठे झाले आहेत. दुर्मिळ मानले जाणाऱ्या छोटी मधुचे बछड्यांसह पर्यटकांना दर्शन झाले होते. त्यांनी आपला अनुभव सुद्धा इतरांसोबत शेअर केला होता. शिवाय माया आणि बछडे, मटकासूर, छोटी तारा, लारा हे वाघ वाघीण देखील ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातील हिवाळ्यातील पर्यटन हंगाम गाजवतात.
तर हिवाळ्यात वाघांना बघण्याची संधी तुम्ही सुद्धा घालवू नका. झरना जंगल लॉज संगे तुमची उत्तम जंगल सफारी व स्टे बुक करा आणि जंगलातील गुलाबी थंडीचा आनंद घ्या.
Comments
Post a Comment