ताडोबा जंगलाला दिलेली भेट सर्वोत्तम का ठरते?
आपण कितीही मोठे झालो तरीही जंगलातील सफर ही आपल्यासाठी नेहमीच आनंददायक ठरते. तुम्ही तुमची पहिली जंगल ट्रिप करत असाल किंवा पाचवी, ते जंगल तुम्हाला वन्यजीव प्राणी आणि पक्षांच्या मोहक दृश्यांसोबतच नवनवीन वैविध्यपूर्ण झाडांनी नटलेल्या दाट वनांसह अचंबित करण्यास कधीही अपयशी ठरत नाही. प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात पट्टेदार वाघांची तीव्र गर्जना, घुबडांचा आवाज, गरुडांचे किंचाळणे, हरणांचे ओरडणे, हंगामी पक्ष्यांचा किलबिलाट या सर्वच अनुभव तुम्हाला येथे जंगल सफारी दरम्यान घेता येईल. आतापर्यंत ज्या भारतीय अभयारण्यांबद्दल काळजी घेतली जाते, त्यातीलच एक ताडोबा अंधारी नॅशनल पार्क म्हणजे वन्यजीव प्रेमींच्या दृष्टीने एक अतिशय उत्तम असे खाद्य आहे.
तुम्ही ताडोबा जंगल एक्सप्लोर करण्यासाठी जेव्हा प्रवास करता तेव्हा, निसर्गाचे मंत्रमुग्ध करणारे सौंदर्य तुम्हाला रोमांचित करतील. ही एक अशी रोमांचित करणारी गोष्ट आहे जी आपल्यापैकी बहुतेकांना आयुष्यात एकदा तरी अनुभवण्याची इच्छा असते. जर तुम्ही सुद्धा आमच्यासारखे असाल तर, खरे निसर्गप्रेमींनो, हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. जंगल सफारी, प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास, ताडोबा अंधारी नॅशनल पार्कमधील सभोवतालच्या वातावरणातून तुम्हाला काय अपेक्षा करता येतील आणि जंगलात एक परिपूर्ण मुक्काम तुमच्या सुट्टीचा आनंद कसा वाढवू शकतो हे सर्व इकडे आम्ही तुम्हाला सांगू.
जेव्हा तुम्ही भटकंती न केलेल्या जागा भटकण्यासाठी तयार होता, तेव्हा सर्वात पहिले तुमच्या डोक्यात सुरक्षित व आरामदायी राहण्याच्या ठिकाणाचा विचार येतो. तर यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे झरना जंगल लॉज हेच असेल.. ताडोबा टायगर रिझर्व्हने वेढलेले 'झरना जंगल लॉज' हे नाणेगाव गेट जवळील सर्वाधिक लोकप्रिय असे रिसॉर्ट आहे. हे पर्यावरणास अनुकूल असे राहण्याचे सर्वोत्तम ठिकाण असून जंगलातील थरार अनुभवण्यासाठी तुमचा मूड सेट करेल. सर्व आधुनिक हॉटेल सुविधांनी सुसज्ज, असे हे रिसॉर्ट दाट जंगलाच्या मध्यभागी वसलेले आहे. तुम्ही आधीच आपली आरामदायक रूम बुक करा आणि जंगलसफारी व त्रासमुक्त सुट्ट्यांचा आनंद घ्या.
ताडोबा हे बंगाल वाघांचे घर आहे. या घनदाट जंगलामध्ये जवळपास ४० पेक्षा अधिक वाघांना आश्रय दिला आहे. वाघांना बघण्यासाठी ताडोबा हे अतिशय योग्य असे नैसर्गिक वन्यजीवांचे घर आहे. तुम्ही इकडे लोकप्रिय अशा वाघांना बघू शकता ज्यांची नावे सुद्धा ठेवलेली आहेत. माया, छोटी तारा, नामदेव, सोनम हे सर्व ताडोबामधील स्टार्स आहेत जे येणाऱ्या विझिटर्सना त्यांच्या अवाढव्य थरारक वावराने थक्क करतात.
आपण हे म्हणायलाच पाहिजे की, राष्ट्रीय उद्यानाला निसर्गाचा आशीर्वाद लाभला आहे. येथे न संपणारा पाण्याचा साठा जसे की ताडोबा तलाव, इरई धरण, अंधारी नदी, जूनोरिया तलाव, कोळसा तलाव अशा स्वच्छ पाण्याचे जलाशय तेथे आहेत जिकडे वन्यजीवांच्या अनेक प्रजाती आढळतात. सागवान, बांबू, हलडू, सलाई, शीशम, सूर्य, बेल, तेंदू, बहेरा, कुर्लु, धौडब, बेर, सिसू आणि अशा बऱ्याच प्रमुख वनस्पती या पर्णपाती जंगलात आढळतात.
बर्डवॉचिंग ही येथील एक समाधानकारां ऍक्टिव्हिटी आहे जी खूप आधीपासून चालत आली आहे. जर तुम्ही इच्छुक बर्डवॉचर असाल आणि तुम्ही पक्षांच्या जीवन उत्तमरीत्या जाणत असाल तर तुमच्यासाठी ताडोबा हे ठिकाण योग्य आहे. ग्रे हेडेड फिशिंग ईगल, इंडियन पिट्टा, हनी बझार्ड, मलबार पाईड हॉर्नबिल, गोल्डन ओरिओल, टिकल्स ब्लु फ्लायकॅचर, मोटेल्ड वूड आऊल, ड्रॉनगोस, लार्क्स, इंडियन श्चिमीटर बॅब्लर इत्यादी लोकप्रिय पक्षांच्या प्रजाती तुम्हाला येथे पाहायला मिळतील. आणि शेवटी, अशा अनेक प्रजाती, आकर्षक नजारे तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील.
झरना जंगल लॉज मध्ये जंगल सफारी पॅकेज आणि तुमचा स्टे आधीच प्री-बुक करून ठेवा असे आम्ही सांगतो.. आमच्याबरोबर राहणे हा तुमच्या सुट्टीचा सर्वात आनंददायक अनुभव असेल. घनदाट जंगलाच्या मध्यभागी पूर्ण आतिथ्य देऊन.निसर्गाचा आणि वन्यजीवांचा आनंद घेण्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.
Comments
Post a Comment