पक्ष्यांवर होतोय तापमान बदलाचा परिणाम!

जागतिक तापमानवाढ, प्रदूषण आणि वातावरण बदलांमुळे संपूर्ण जीवसृष्टी बदलत आहे. या सर्वांचा परिणाम फक्त मानवजातीलाच भोगावा लागत आहे असे नाही. तर प्राणी-पक्ष्यांसह विविध वन्यजीवांनाही या बदलांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच एका नव्या संशोधनावरून एक खळबळजनक बाब समोर आली आहे. जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदलांचा सर्वात जास्त फटका पक्ष्यांना बसल्याचे या संशोधनांमधून उघडकीस आले आहे. जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदलांमुळे पक्ष्यांचा आकार लहान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे... 
या पक्ष्यांचा आकार छोटा होत आहे तर त्यांच्या पंखांची लांबी वाढल्याचे संशोधकांना आढळले. हा अभ्यास प्रामुख्याने अमेरिकेत करण्यात आला. पण या जागतिक तापमानवाढीचा फटका फक्त अमेरिकेलाच नव्हे संपूर्ण जगातील पक्ष्यांना बसत असल्याचा संशोधकांचा दावा आहे. उष्ण प्रदेशातील पक्ष्यांचा आकार हा थंड प्रदेशातील पक्ष्यांपेक्षा लहान असतो असेही एका संशोधनात संशोधकांना आढळले. पण आता तापमानवाढीमुळे सर्वच प्रदेशातील पक्ष्यांचे आकार लहान होत आहेत आणि ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहेत हे सुद्धा संशोधनातून निश्चित झाले...
संशोधकांनी पक्ष्यांच्या ५२ प्रजातींचा प्रामुख्याने अभ्यास केला. यात किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांची संख्या सर्वाधिक होती. त्यात चिमण्या, वार्बलर आणि इतर पक्ष्यांचा समावेश होता. पूर्वीच्या पक्ष्यांची उंची आणि त्यानंतर आताच्या उंच इमारतींवर आदळून मृत्युमुखी पडलेल्या पक्षांचे नमुने गोळा करून त्यांची उंची मापली गेली, वजन, लांबी-रुंदीच्या नोंदी ठेवल्या गेल्या. आणि त्यानंतर संशोधक या निष्कर्षावर पोहोचले की वातावरण बदलांमुळे पक्ष्यांवर खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. पूर्वीच्या पक्ष्यांप्रमाणे आताचे पक्षी राहिले नाहीत. त्यांची उंची कमी झाली आहे.
गेल्या ४ दशकांमध्ये पक्षांमध्ये बराच बदल झाला आहे. यासाठी तापमानातील बदल कारणीभूत असून पक्ष्यांवर याचा विपरीत परिणाम घडून येत आहे. त्यांचा आकार लहान होऊन पंखांची लांबी वाढली, जेणेकरून त्यांना लांब आणि उंच प्रवास करता येईल. वातावरणात होणारे बदल स्वीकारताना पक्षांचे पाय छोटे आणि पंख मोठे होत आहेत. मानवनिर्मित अडथळे व वातावरण बदलांचे परिणाम सध्या पक्षी भोगत आहेत. सोबतच या वातावरण बदलांमुळे पक्ष्यांची संख्या कमी सुद्धा होत आहेच. ताडोबा हे अशाच विविध पक्षांचे घर आहे. दरवर्षी विविध प्रकारचे अनेक पक्षी सहाऱ्यासाठी ताडोबा येथे येतात आणि ताडोबामध्येच वास्तव्य करतात. परंतु त्यांच्यात तेजीने होणाऱ्या बदलांना कोणीही थांबवू शकत नाही.

Comments

Popular posts from this blog

How can I go to Tadoba from Hyderabad?

How can I go to Tadoba from Mumbai?

Are Tiger Reserves Safe for the Future