वाघांबद्दल तुम्हाला 'या गोष्टी' माहिती आहेत काय?
जंगलातील मोठे मांजर ज्याला म्हंटले जाते अशा वाघाने जंगलात डरकाळी फोडली किंवा त्याची झलक जरी दिसली तरीही जंगल सफारीवर असणाऱ्या लोकांची एक्साइटमेंट, कुजबुज किंवा आवाज वाढतो. तथापि, जेव्हा वाघ दिसतो तेव्हा सर्व खूप उत्साही होतात आणि त्याचे फोटोज काढू लागतात. एखाद्या प्राण्याला प्राणीसंग्रहालयात पाहण्यापेक्षा थेट जंगलात पाहणे हे अधिक मनमोहक असते. पण जेव्हा आपण जंगलात त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या हद्दीत प्रवेश करतो तेव्हा आपण त्यांच्या क्षेत्राचे सर्व नियम पाळले पाहिजेत. आपण त्यांचे वातावरण आणि त्यांची मोकळीक स्वीकारणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मानव-प्राणी संघर्ष हळूहळू नियंत्रित झाला आहे. जंगल वाढविण्यासाठी आणि प्राण्यांची जागा टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. जंगलाचा राजा सिंहाप्रमाणेच वाघ हा सुद्धा एक अतिशय सुंदर असा प्राणी आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असल्याने आपल्याला त्याच्याविषयी काही तथ्य समजून घेणे आवश्यक आहे. वाघ एका पंजाने ही माणसाला मारू शकतो. वाघाशी पंगा घेण्याऐवजी मनुष्याने त्याच्या सौंदर्याविषयी अधिक जाणून घेणे आवश्यक आहे. त्याच्या सौंदर्य