रिसॉर्टमध्ये 'उत्तम' वातावरण कसे असावे?
हॉस्पिटॅलिटी उद्योग हळूहळू बदलत आहे आणि यात अनेक विकासात्मक बदल घडून येत आहेत. लॉजिंग पासून सुरु केलेला हा व्यवसाय आता हॉटेल आणि त्यानंतर रिसॉर्ट्स पर्यंत येऊन थांबला आहे. लॉजिंग हा प्रवासादरम्यान राहण्यासाठी मर्यादित असा पर्याय होता, त्याचप्रमाणे जेवण आणि पेय या मूलभूत सुविधा पुरवण्याच्या बाबतीत हॉटेल्स सुद्धा औपचारिक असत. या तुलनेने रिसॉर्ट्स अनेक सुविधा पुरवतात.
रिसॉर्ट्स लोकांना आकर्षित करून त्यांना आरामदायक जागांसोबतच अनेक सोयी-सुविधा पुरवतात. हे रिसॉर्ट्स लोकांना उत्तम सेवा आणि ग्राहकांच्या प्राधान्यक्रम पुरवण्यासाठी काम करतात. ग्राहकांच्या राहण्याची आणि त्यांच्या गरजांची येथे मुख्यतः काळजी घेतली जाते. त्यांच्याकडे साधारण रूम्स ते सूट रूम्स पर्यंतचे विविध प्रकार उपलब्ध असतात. त्यांचे इंटिरिअर आणि सुविधा या त्यांच्या स्टॅंडर्ड प्रमाणे राखले जाते. त्यातील काही कॉटेज आणि विलाज हे ग्राहकाच्या निवडीनुसार गोपनीय आणि शांत असतात.
तेथील रेस्टॉरंट्सच्या बाबतीतही, त्यांच्या अतिथींना प्रसन्न करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वाढले जातात. बऱ्याच ठिकाणी खेळून झाल्यावर अतिथींना एक वेगळे ठिकाण जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.
आरामदायक निवास आणि भोजनाव्यतिरिक्त अनेक ठिकाणी गेम्स, स्विमिंग, क्लब आणि स्पोर्ट्स असे अनेक प्रकार असतात. इतरत्र फिरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या रूम मध्ये आराम सुद्धा करू शकता.
अनेक रिसॉर्ट्स मध्ये त्यांच्या अतिथींसाठी विविध ऍक्टिव्हिटीज आयोजित केल्या जातात. रिसॉर्ट्स त्यांच्या अतिथींना दर्जेदार आणि समाधानी ट्रिप प्रदान करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.
त्याचप्रमाणे रिसॉर्ट्स हे पर्यटनस्थळ आणि आसपास असणाऱ्या लोकप्रिय जागांच्या जवळ उत्तम ठिकाणी बांधलेले असतात. जेणेकरून रिसॉर्ट मध्ये येणाऱ्या अतिथींना या सर्वांचा लाभ होईल.
समुद्रकिनाऱ्याजवळील रिसॉर्ट म्हणजे केवळ भारतीय नव्हे तर परदेशी पर्यटकांना देखील आकर्षित करतात. त्याचप्रमाणे अभयारण्य किंवा जंगलाच्या जवळ असणारे रिसॉर्ट्स हे वन्यजीव प्रेमींना आकर्षित करतात. 'ताडोबा टायगर रिझर्व्ह' च्या जवळ असलेले नवेगाव गेटजवळील झरना लॉज हे अशाच लोकप्रिय रिसॉर्ट्स पैकी एक आहे.
Comments
Post a Comment