रिझर्व्ह्स पर्यावरणाचे रक्षण कसे करतात...
"आज शहरातल्या गजबजलेल्या ठिकाणी बिबळा आढळला!" यासारख्या ब-याचशा बातम्या आपण ऐकत असतो. ही अनेकांसाठी ब्रेकिंग न्यूज असेल पण वन्यप्राणी शहरात का येत आहेत... याचा विचार करणे खरचं गरजेचे आहे. भारतात जंगल झपाट्याने कमी होऊन त्यावर कॉंक्रिटचे टॉवर उभारले जात आहेत. यामुळेच जंगल आणि वन्यप्राण्यांची अशीही वाताहात पहायला मिळत आहे.
एवढं होत असलं तरीही भारतात काही संरक्षित वन आहे जे फक्त वन्य प्राण्यांसाठी समर्पित केलं आहे. जसा सिंह हा जंगलचा राजा तसा वाघाला वनांमध्ये वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे आणि सध्या देशात वाघांची अवस्था फारच बिकट आहे. याचसाठी राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने (NCTA) पुढाकार आहे.
भारत सरकारतर्फे बंगाल टायगरसाठी 'प्रोजेक्ट टायगर' हा व्याघ्र संरक्षण प्रोग्राम सुरु केला गेला आहे. याअंतर्गत वाघांचे संरक्षण त्यांची देखभाल केली जाते. असे आपल्या देशात ५० टागर रिझर्व्हस आहेत. या रिझर्व्हसमध्ये जंगल सफारीद्वारे पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाते.
जंगल सफारी हे लोकांसाठी एक मनोरंजन आणि शिकण्याचे स्थान आहे. निसर्ग, जंगल आणि वन्यजीवांकडून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आणि हा वारसा आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो. तरच भविष्यातील आपली पिढी जंगल वाचवू शकेल. दरम्यान, काही वर्षांपासून जंगल सफारीकडे पर्यटकांचा कल वाढत चालला आहे. हेच कार्य ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 'झरना जंगल लॉज' करीत आहे. झरना जंगल लॉजला भेट द्या आणि व्याघ्र प्रकल्प आणि जंगल सफारीला भेट द्या...
Comments
Post a Comment