ताडोबामधील स्वच्छतेबद्दलची वाढती चिंता!
झरना जंगल लॉज हे ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असल्याने वन्यजीव अभयारण्य फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आमच्या लॉजमार्फत उत्तम सेवा पुरविण्यात आम्हाला अतिशय आनंद होतो. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह ही एक वेगवेगळी वनस्पती-झाडे आणि विविध प्रजातीच्या वन्यप्राण्यांचा अनुभव घेण्याची एक उत्तम जागा आहे, त्यामुळेच या स्वर्गासमान जागेस भेट देणाऱ्या लोकांच्या अपेक्षा अर्थातच वाढलेल्या आहेत.. आणि का नसाव्यात? ताडोबाची सुंदरता आहेच स्वर्गासमान.. पैसा, वेळ गुंतवणारा व जंगलातील थरार अनुभवण्यासाठी धडपड करणारा प्रत्येक जण जंगलातील उत्तम अनुभव घेण्यास पात्र असतो. सध्या ताडोबा फिरून येणारे अनेक पर्यटक त्यांचे रिव्ह्यूज आमच्यासोबत शेअर करत आहेत. जवळजवळ प्रत्येक भेट देणारे पर्यटक एकच गोष्ट वारंवार सांगत आहेत आणि ती म्हणजे स्वच्छताविषयक अतिशय वाईट सुविधा.. ताडोबाच्या स्वच्छताविषयक सुविधांची तुलना थेट पेंच नॅशनल पार्क, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आणि इतर वन्यजीव अभयारण्यांशी केली जाते.
ताडोबा अभयारण्यातील मध्यभागी असणारे खातोडा येथे स्वच्छतेच्या सुविधेची सर्वात दयनीय अवस्था आहे. लोकांसाठी जंगलात असणाऱ्या मूलभूत सुविधा सुद्धा नीट पुरविल्या जात नसल्याने ताडोबाला भेट देणारे पर्यटक वारंवार जंगल अधिकाकाऱ्यांबद्दल तक्रार करत असतात. एका पर्यटकाने तर पेंच नॅशनल पार्कमधील वॉशरुम्स हे मॉलपेक्षाही स्वच्छ असतात असे सांगितले, त्यांच्याकडे वॉशरुम्स साफ करण्याची काळजी घेणारे, चांगल्या जंतुनाशकासह जागा स्वच्छ पुसणारे लोक असतात, तिकडे टॉयलेट पेपर्स, टिश्यू पेपर्स ठिकठिकाणी उपलब्ध असतात. पण खातोडा येथील वॉशरुम्स मध्ये तुम्हाला तुमचे नाक बंद करूनच आत जावे लागेल. ताडोबा टायगर रिझर्व्हमध्ये स्त्रिया, लहान मुलं, वृद्ध किंवा अपंगांसाठी कोणत्याच स्वच्छता सुविधा नाही.
ताडोबा हे जंगल सफारी, वन्यजीव व विविध प्रकारच्या झाडेझुडुपांसाठी लोकप्रिय असल्यामुळे पर्यटकांनी दर्शविलेली ही परिस्थिती आम्हाला नक्कीच ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह बद्दलची काळजी करायला भाग पाडते. झाराना जंगल लॉज तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि सोईसाठी नेहमीच काळजी करत असतो.
ताडोबामधील बिघडत चाललेली स्वच्छताविषयक परिस्थिती सुधरविण्यासाठी व पर्यटकांना येणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी झरना जंगल लॉज नेहमीच प्रयत्न करत राहील. ही गोष्ट प्रत्यक्षात येईपर्यंत व जंगल अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालेपर्यंत आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जंगल सफारीचा आनंद घ्या, आणि बाकीच्या सर्व सोयी-सुविधांसाठी आम्ही तर इकडे आहोतच!!
Comments
Post a Comment