डिजिटल जंगल सफारी!

 


प्रत्येक वन्यप्रेमीसाठी जंगल सफारी हा त्याचा आवडता भाग असतो. ज्यात त्यांना निसर्गरम्य वातावरणात नवनवीन अनुभव घेता येतात. विशेष करून जंगलातील प्राणी आणि पक्षी यांच्या विविध जातीसुद्धा पाहता येतात. अनेक जण ते क्षण विविध प्रकारे आपल्या आठवणीत साठवतात. बहुतेक जण हे त्या क्षणाचे सुंदर छायाचित्रण करतात. पण आता कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे हे सगळं अनुभवणं शक्य नाही असं वाटत असताना आपल्या पर्यटकांसाठी डिजिटल जंगल सफारी सुरु झाली.  

 काय आहे डिजिटल जंगल सफारी?
आजच्या डिजिटल प्रणालीमुळे सर्व काही शक्य होऊ लागले आहे. तर वन्यप्रेमींसाठी डिजिटल जंगल सफारी का शक्य नसणार. या डिजिटल जंगल सफारीमध्ये अनेक गोष्टी पर्यटकांना अनुभवायला मिळाल्या. विविध प्राणी आणि पक्षी यांची माहिती सर्वांना मिळाली. या डिजिटल सफारीचा अनुभव वन्यप्रेमी त्यांच्या घरी बसून मित्रपरिवारबरोबर घेत आहे.  

ताडोबाची डिजिटल जंगल सफारी

 ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (टीएटीआर) सुरू केलेल्या डिजिटल जंगल सफारीला इंटरनेट युजर्सकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ताडोबाची ही डिजिटल जंगल सफारी लॉकडाऊनमध्ये घर बसलेल्या सुमारे सहा लाखांहून अधिक  पर्यटकांनी अनुभवली. राज्याच्या वनमंत्र्यांनी टीएटीआर अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक सुद्धा केले.
ताडोबाची डिजिटल सफारी काहीशी निराळी होती कारण या सफारीमध्ये पर्यटकांना घर बसल्या विविध प्राणी व पक्षी पाहायला मिळाले.  त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा मिळाली. त्याचबरोबर काही सफारी विशेषतः रात्रीच्या वेळेस चित्रित केल्या गेल्या. त्यामुळे पर्यटकांना हा वेगळा अनुभव घेता आला.


ही कल्पना  कुठून आली?

 आपल्या घरातील टीव्ही स्क्रीनवर व  इतर सोशल मीडिया माध्यमांवर पर्यटकांना डिजिटल सफरीचा आनंद ताडोबामुळे मिळाला. ही संकल्पना सर्वप्रथम आफ्रिकेतील क्रुगर नॅशनल पार्कने सुरू केली होती आणि नंतर आपण सुद्धा ती स्वीकारली.

ताडोबा अभयारण्यात वन्यप्रेमींसाठी उभारलेलया 'झरना जंगल लॉज'मध्ये (Jharana jungle Lodge) एक वेगळाच अनुभव मिळतो. कारण या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना ताडोबामध्ये राहण्याची संधी मिळते. बर्ड वॉचिंग, जंगल सफारी, शहरात राहून आपल्याला कधी विविध तारे पाहता येत नाही पण हे ही या ठिकाणी शक्य आहे. अश्या अनेक गोष्टी तुम्हाला झरनाद्वारे अनुभवता येतात. तर वाट कसली बघत आजच झरनाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा संपर्क करा. तुमची लॉकडाऊन नंतरची बुकिंग करा.
अनुभवा तुमचा ताडोबा, झरनासोबत!

Comments

Popular posts from this blog

How can I go to Tadoba from Hyderabad?

How can I go to Tadoba from Mumbai?

Best Time to Visit Tadoba National Park