डिजिटल जंगल सफारी!
प्रत्येक वन्यप्रेमीसाठी जंगल सफारी हा त्याचा आवडता भाग असतो. ज्यात त्यांना निसर्गरम्य वातावरणात नवनवीन अनुभव घेता येतात. विशेष करून जंगलातील प्राणी आणि पक्षी यांच्या विविध जातीसुद्धा पाहता येतात. अनेक जण ते क्षण विविध प्रकारे आपल्या आठवणीत साठवतात. बहुतेक जण हे त्या क्षणाचे सुंदर छायाचित्रण करतात. पण आता कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे हे सगळं अनुभवणं शक्य नाही असं वाटत असताना आपल्या पर्यटकांसाठी डिजिटल जंगल सफारी सुरु झाली. काय आहे डिजिटल जंगल सफारी? आजच्या डिजिटल प्रणालीमुळे सर्व काही शक्य होऊ लागले आहे. तर वन्यप्रेमींसाठी डिजिटल जंगल सफारी का शक्य नसणार. या डिजिटल जंगल सफारीमध्ये अनेक गोष्टी पर्यटकांना अनुभवायला मिळाल्या. विविध प्राणी आणि पक्षी यांची माहिती सर्वांना मिळाली. या डिजिटल सफारीचा अनुभव वन्यप्रेमी त्यांच्या घरी बसून मित्रपरिवारबरोबर घेत आहे. ताडोबाची डिजिटल जंगल सफारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (टीएटीआर) सुरू केलेल्या डिजिटल जंगल सफारीला इंटरनेट युजर्सकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ताडोबाची ही डिजिटल जंगल सफारी लॉकडाऊनमध्ये घर बसलेल्या सुमारे सहा लाखांहून