'झरना जंगल लॉज' प्राणी आणि पर्यावरणाची काळजी घेणारा प्रकल्प!



जंगल म्हटलं की हिरवी घनदाट झाडे, पशू आणि पक्ष्यांचे राहण्याचे स्थान पण जेव्हा मनुष्याने जंगलात पाऊल टाकले, तेव्हापासून पशू आणि पक्ष्यांचे जगणे कठीण झाले. जंगल सफारीच्या नावाखाली अनेकांनी पर्यटनाचा बिझनेस थाटला. या बिझनेसमुळे अबोल असे पशू-पक्षी आपल्या घराला मुकले आणि एकूणच पर्यावरणाच्या -हासाला सुरुवात झाली आहे. 

दरम्यान, 'झरना जंगल लॉज' या परिस्थितीला अपवाद ठरला आहे. पर्यावरणाला कोणताही धक्का लागणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल साधून पर्यटनाचा व्यवसाय कसा करता येईल, याकडे 'झरना जंगल लॉज'ने जातीने लक्ष दिले. आणि त्यात ते उत्तमप्रकारे यशस्वी झाल्याचे दिसते. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे सर्व लॉज नापीक जमीनीवर बांधले असून पर्यावरणाला धक्का लागेल असे कोणतीही पाऊल आम्ही उचलले नाही आणि भविष्यातही उचलणार होणार नाही. 

'झरना जंगल लॉज'च्या सभोवतालीच आम्ही छोटसं वनराई सुरु केली. त्यात अनेकप्रकारच्या वृक्ष आणि वनस्पतीची लागवड केली. आज ते वृक्ष सावली आणि फळं द्यायला लागली आहेत. तसेच लॉजच्या एका भागात हरीण, वन्य डुक्कर, जंगल मांजरी, वाघ, बिबळ्या, कोल्हा, पाम सिव्हेट, अस्वल, ससे आणि पक्षी पाहिले गेले आहेत. आम्ही त्यांच्यासाठी पाणी-चा-याची सोय केली आहे.  

'झरना जंगल लॉज'मध्ये येणारे पर्यटक दर्दी आहेत आणि त्यांना वन्यप्राणी आणि पक्ष्यांबाबत आत्मियता आहे. आम्ही त्यांच्याकडून झाडे लावणे, त्यांची निगा राखणे असे सामजिक कामंही करुन घेतो. म्हणूनच ते आमच्यासोबत जोडले आहे. पर्यावरण हे सर्वांसाठी मनुष्य, प्राणी-पक्षी आणि पृथ्वीतलावरील सर्वांसाठी... मनुष्याने स्वतःचे जीवन जगताना सर्वांचा विचार केला पाहिजे. तरचं पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि आम्ही हे सुरु केल आहे. तुम्हीही या अभियानात सहभागी व्हा आणि सर्वांनी मिळून पर्यावरण समृद्ध करुयात...

Comments

Popular posts from this blog

How can I go to Tadoba from Hyderabad?

How can I go to Tadoba from Mumbai?

Are Tiger Reserves Safe for the Future