ताडोबा - वाघांची भूमी



भारताच्या मध्यभागी 600 चौरस किलोमीटर अंतरावर ताडोबा व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. येथे 80 हून अधिक बंगाल वाघ, अन्य प्राणी आणि वनस्पती आढळतात.

बिबटा, गोर, स्लोथ भालू, स्पॉट हिरण, सांभर, चार-शिंगे असलेले अँटलॉप्स यासह येथे शेतकरी आणि आदिवासी गुण्यागोविंदाने नांदतात. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानात आपल्याला जैव विविधताही पहायला मिळते. 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये 6 गेट्स आहेत. तेथून व्याघ्र सफारीचे प्रारंभ होते...  

1. मोहरली गेट: उद्यानातील सर्वात जुने प्रवेशद्वार
2. कुसुंडा गेट
3. कोलारा गेट
4. नवीगाव गेट
5. पांगडी गेट
6. झारी गेट

अशी ही प्रवेशद्वारं आहेत...

ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी झरना जंगल लॉज नवेगाव गेटजवळून दिवसाच्या सफारी पॅकेजेस तसेच राहण्याची सोय करतो.

हिवाळ्यातील चार महिने हा ताडोबाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो; परंतु एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये वाघांना त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानात पाहण्यासाठी उत्तम संधी आहे.

ताडोबाचा राजा मटकासुर आहे. हा या संरक्षित वाघांपैकी एक नर वाघ आहे; पण ताडोबाचा अभिमान म्हणजे माया वाघीण. ती पंढर पूनीच्या जवळील प्रदेशची शासक आहे आणि व्याघ्र प्रकल्पाच्या वाढत्या वाघांमध्ये ती सर्वात प्रभावी आहे. जगभरातून अनेक पर्यटक ताडोबाची राणी मायाला पाहण्यासाठी येतात.


तर पर्यटकांनो, तुम्ही कधी येताय ताडोबा व्याघ्र प्रकल्प पहायला???

Comments

Popular posts from this blog

How can I go to Tadoba from Mumbai?

World Water Day - How water is the necessity for Wildlife

How can I go to Tadoba from Hyderabad?