ताडोबामध्ये 'या' वन्यप्राण्यांना पाहिलं नाहीत तर तुमची सफर अपूर्णच आहे...
ताडोबा हे देशातील सर्वात जुनं अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य पर्यटक आणि निसर्ग प्रेमींसाठी एक स्वर्गच आहे. देश-विदेशातील हौशी पर्यटक, निसर्ग तसेच प्राणी अभ्यासक वर्षातून एकदा तरी ताडोबा अभयारण्य भेट देतात. यामध्ये पर्यटकांच्या मनाला मोहिनी घालणारं म्हणजे येथील वेगवेगळे वन्यप्राणी आणि 200 हून अधिक पक्ष्यांच्या विविध जाती...
म्हणूनच 'झरना जंगल लॉज'च्या ब्लॉग सीरिजमध्ये आपण पाहू यात 5 युनिक प्राणी ज्यांना पाहिल्याशिवाय तुमची ताडोबा सफर अपूर्णच राहील...
गवा... यास रानगवा किंवा इंडियन बायसन असे संबोधतात. ते ताडोबामधील सर्वाधिक बोवाइन प्रजातीचे प्राणी आहेत. अनेक पर्यटक आणि वन्यप्राणी रानगवा पाहण्यासाठी येथे येतात.
ब्लॅक पॅन्थर... गेल्यावर्षीच्या मे महिन्यात बेल्जियन कुटुंबाने ताडोबामध्ये सर्वप्रथम ब्लॅक पॅन्थर पाहिला. काल्पनिक मालिका 'मोगली'मधील बगीराला खरं-खुरं पाहायचं असेल तर ताडोबाला नक्की भेट द्या.
अस्वल... ताडोबामध्ये यांना शोधणं म्हणजे कर्मकठीण पण छोट्या-मोठ्या तलावाच्या काठी तुम्ही सुस्त अस्वलांना नक्की पाहू शकता. ही अस्वल ताडोबामधील युनिक वन्यजीव आहेत.
लंगूर... माकडाच्या प्रजातीमधील लंगूर तुम्हाला ताडोबामध्ये अनेक ठिकाणी पहायला मिळतील. त्यांचं झाडावरील बागडणं, या फांदीवरुन त्या फांदीवर उड्या मारणं... यांना पाहून तुमचे मन प्रसन्न होईल.
रानमांजर... ताडोबा अभयारण्यामध्ये 2007 साली रानमांजर आढळले होते. साधारणतः भारतीय उपखंडात आढळणारं या मांजराची जात फार दुर्मिळ आहे. जर तुम्हाला अशी मांजरं ताडोबात पहायला मिळाली तर ते तुमचं भाग्यच आहे.
ताडोबा जंगल सफारीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी 'झरना जंगल लॉज' वेबसाईटला फॉलो करा.
Comments
Post a Comment