तुम्हाला वाघांबद्दल 'ही' महत्त्वाची तथ्य माहीत आहेत का?
सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणून ओळखतो पण त्याच्याच तोडीस तोड असणारा प्राणी म्हणजे वाघ... सिंह आपल्याला एकटाच दिसतो तर वाघ आपल्या कुटुंबासमवेत जंगलात फिरताना दिसतो. वाघ, वाघीण त्यांच्या अंगा-खांद्यावर बागडताना किती सुंदर आणि लोभस दिसतात ना...
तर मित्रांनो आज आपण पाहू यात वाघांबद्दल काही तथ्यं जी तुम्हाला माहीत नसतील... पाहू यात कोणती आहेत ती...
वाघ हे त्यांच्या क्षेत्राताबाबत फार संवेदनशील असतात. त्यांना आपल्या क्षेत्रात कुणी आलेले आवडत नाही. दुसरा प्राणी आलाच तर त्याच्यावर ते तुटून पडायलाही मागे पुढे पाहत नाहीत.
वाघामध्ये ३० फूटांपर्यंत लांब उडी मारण्याची क्षमता असते आणि ते वेगाने पोहूही शकतात.
वाघाच्या अंगावरील पट्टे हे मानवी फिंगरप्रिंट्सप्रमाणे युनिक असतात. वाघ त्यांचे क्षेत्र मूत्राद्वारे, झाडावर निशाण किंवा गर्जना करुन ठरवतात.
वाघाचे वय त्याच्या नाकाच्या रंगावरुन ठरवतात. तारुण्यात त्यांचे नाक गुलाबी रंगाचे असते, जसजसे त्यांचे वय वाढत जाते त्यांच्या नाकाचा रंग काळसर-तपकिरी होत जातो.
तर ही आहेत वाघांबद्दलची काही तथ्य... वाघ, जंगल सफारीबद्दल अधिक माहितीसाठी झरना जंगल लॉजला फॉलो करीत रहा!
Comments
Post a Comment